@@जगप्रसिद्ध लोणार सरोवर@@
बुलढाणा जिल्हा म्हटले की दोन गोष्टी आठवतात एक म्हणजे शेगाव ,शेगाव म्हणजे गजानन महाराज विदर्भातील पंढरी आणि दुसरे म्हणजे जगातील अद्भुत आश्चर्य उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर. बेसॉल्ट खडकातील जगातील ते एकमेव असे खारट सरोवर आहे. अजिंठा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये तयार झालेले हे जागतिक आश्चर्य बघायचा योग पुन्हा काही वर्षांनी मला आला. लोणार सरोवर मि अगोदर जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी बघितले होते पण ते वरवरच ,काठावरूनच या वेळेस ठरवले, की जायचे ते निवांत वेळ काढूनच आणि सरोवर शांतपणे आणि निवांत बघायचे.माहूर गडावरून येतांना वाशिमचा मुक्काम आटोपून भल्या पहाटे सकाळी लवकर उठून लोणारचा रस्ता धरला.गुलाबी थंड हवा आमची साथ करत होती. रस्त्याच्या कडेला असलेला परिसर भीषण दुष्काळाची जाणीव करून देत होता काळ्या मातीत पांढरं सोनं उगवणारी काळी कसदार जमीन निसर्गापुढे मात्र हा हतबल झाली होती. कपाशीने आपल्या माना केव्हाच टाकल्या होत्या माणसं या दुष्काळातही निसर्गाशी दोन हात करतात त्यांच्या जिद्दीला मनापासून मनातल्या मनात सलाम करत होतो .
वाशिम ते लोणार खरेतर पन्नास साठ किलोमीटर अंतर हे पार करायला फारसा वेळ लागला नाही.संतोष गोपाळे, मित्र आणि पोट नाश्ता करण्याची वेळ आली आहे असे सांगत होते पण आता नाष्टा लोणार या जगप्रसिद्ध ठिकाणीच करू असे म्हणून गाडीचा वेग जास्तच वाढविला. सुनिल पवार व किरण आवटी रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे मधून मधून आळस देत होते. अंगद उदमले नेहमीप्रमाणे राजकारणावर चर्चा करत होते.वाऱ्याबरोबर स्पर्धा करत एकदाची आमची गाडी लोणार पोहोचली.
लोणार खरेतर तालुक्याचे ठिकाण,लोणार मध्ये चांगले हॉटेल शोधता-शोधता दहा-पंधरा मिनिटे लागले.शेवटी मिळाले ते ही सुमारच. हॉटेल समोरून गटारगंगा वाहत होती. कसेबसे एका हॉटेलमध्ये मिसळ आणि मूग वडा खाल्ला. मूग वड्याचा नवीनच प्रकार बघितला तिथला मूगवडा थाली पिठासारखा होता पण चव मात्र अगदी छानच होती.
आमच्या ग्रुपचे एक वैशिष्ट्य आहे जेथे जाऊ तेथिल पदार्थ खायचे ,चाखायचे माणसांची भाषा जशी बदलते तसे पदार्थ आणि पदार्थांची चवही बदलत जाते. आपण विविध ठिकाणची चव चाखायलाच हवी. आपणास तेथील खाद्यसंस्कृती कळते. पुन्हा एकदा मुग वडा घेऊन पोटोबा केला व लोणार सरोवराचा रस्ता धरला. अनेक जणांना विचारत लोणार सरोवर एकदाचे सापडले पण कुठेही व्यवस्थित बोर्ड पर्यटकांसाठी दिसला नाही.
लोणार शहरापासून अडीच कि.मी आंतरावर वन्यजीव अभायारण्याची पाटी दिसली. .गाडी पार्क करून थोडे अंतर गेल्यानंतर एक मनोरा आमचे लक्ष वेधून घेत होता.आमचे सर्वांचे चढाओढ लागली त्यात संतोष गोपाळे सर सगळ्यात आधी मनोऱ्यावर गेले किल्ला सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
पलीकडेच लोणार सरोवराचा निसर्गरम्य देखावा डोळ्यांमध्ये साठवत होतो हसऱ्या चेहऱ्याने गंगाधर सहाने यांनी फोटोग्राफी केली. डोंगरावरून दरीच्या दिशेने जावे तसे आम्ही वरून खाली हळूहळू उतरत गेलो रस्ता फार अवघड नसला तरी फार सोपाही नाही. काळजीपूर्वक हळूहळू,कधी एकमेकांना आधार देत शेवटी कमळजाई मंदिरा पर्यंत जाऊन पोहोचलो. आमच्या स्वागताला येथे मात्र वानर सेना हजर होती. कमळाजाई अतिशय जुन्या काळातील मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याचा ताबा असला तरी नावापुरतीच पाटी आहे. कोणत्या प्रकारची डागडुजी येथे केलेली दिसली नाही. मंदिराच्या बाहेरून अनेक दगड आपली जागा सोडून उभी होती आतून मंदिर मात्र अतिशय देखणे व सुंदर शिल्पकला असलेले आहे. सरोवराच्या परिसरामध्ये अजूनही वेगवेगळी मंदिरे आहेत. मंदिरामध्ये आरती घेऊन व सर्व प्रसन्न होऊन बाहेर आलो त्याच्या पाठीमागे महादेवाचे मोडकळीस आलेले मंदिर आहे.
जवळ जवळ बाराशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असावे असा एक अंदाज आहे. सरोवराचा व्यास दीड ते दोन किलोमीटर व परीघ 11 ते 12 किलोमीटर असावा .सरोवर कप बशी सारखे असून त्याचा उतार बऱ्यापैकी आहे .सरोवर खरेतर गोल नसून हे बऱ्यापैकी अंडाकृती आहे सरोवराचे क्षेत्रफळ १. 13 चौरस किलोमीटर असून सरासरी खोली 137 मीटर आहे. काही शास्त्रज्ञांचे मत आहे की पन्नास हजार वर्षांपूर्वी सरोवराची उल्कापातामुळे निर्मिती झाली असावी तर काहींच्या मते पाच लाख वर्षांपूर्वी सरोवराची निर्मिती झाली असावी. शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांमध्ये याबाबतीत एकवाक्यता नाही.
पौराणिक कथेनुसार लवणासुर नावाचा राक्षस होता. त्याला विष्णूने मारले व त्यावरून या सरोवराचे नाव लोणार अशी पडले.आईन-इ-अकबरी, स्कंदपुराण या पुराणांमध्ये सुद्धा लोणार सरोवराचा उल्लेख आहे. बेसॉल्ट खडकातील इतके सुंदर सरोवर सर्व जगामध्ये कुठेही सापडत नाही. त्यामुळे अनेक देशातून अनेक पर्यटक, वैज्ञानिक दरवर्षी या भागांमध्ये अभ्यास करण्यासाठी व आनंद घेण्यासाठी येत असतात.पंधरा वर्षापूर्वी पाण्याची पातळी आणि आत्ताच्या पाण्याच्या पातळीमध्ये बराच फरक पडला आहे.दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सरोवरांमध्ये पाण्याचा साठा हळुहळू कमी होत आहे. पाणी मात्र अगदी खराब, शैवाल क्षार युक्त असल्यामुळे पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे बहुतेक जीवजंतू नसावेत .सरोवरामध्ये येणाऱ्या नद्याही मर्यादित आहे. पावसाचे पाणी जेवढे येईल तेवढेच सरोवराला पाण्याचा पुरवठा होतो.
सरोवर व आजूबाजूचा परीक्षा परिसर सुरक्षित रहावा म्हणून वन खात्याने हा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. लोणार येथे निवास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल व खाजगी हॉटेलही उपलब्ध आहे गर्दीच्या काळामध्ये मात्र आधी चौकशी व आरक्षण करायला हवे.लोणार सरोवर हे जागतिक दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने तेही संरक्षित करण्यात आले आहे. अभयारण्यात विविध नैसर्गिक वनस्पती असून साग हा एक महत्त्वाचा वक्ष या ठिकाणी आढळतो अभयारण्यात कोल्हा मुंगूस, साप, सरडे असे वेगळे प्राणी आढळत असले तरी आम्हाला दोन तीन तासाच्या वास्तव्यात माकड सोडून प्राणी दिसले नाही.ते बहुतेक आमचे दुर्दैव असावे.खरेतर मनामध्ये लोणार सरोवराच्या आजुबाजुला चक्कर मारावी असे वाटत होते.पण सूर्यनारायण डोक्यावर आग ओकत असल्याने आणि वेळही जास्त झाल्यामुळे परतीचा मार्ग धरण्याचे निश्चित केले.सरोवरामध्ये उतरायला जितके सोपे वाटते तितके मात्र चढायला सोपे नव्हते. हळूहळू एकमेकांना साथ देत,हातामध्ये हात घेऊन हळूहळू मार्गक्रमण करत होतो.वाढलेले वय आणि सुटलेले पोट यामुळे चालणे तसे उन्हामध्ये अवघड होते अंगद उदमले व गंगाधर सहाणे मधून मधून विश्रांतीच्या नावाखाली आमचे फोटो काढत होते.

कपाळावरचा घाम पुसत कधी विश्रांती घेत थकून-भागून एकदाचे वर आलो.आमच्या गाड्या तिथपासून एक दीड किलोमीटर अंतरावर पार्क केल्यामुळे चालणे ही जिवावर आले होते आणि पोटामध्येही आता भुकेचा आगडोंब उसळलेला होता. पोट शांत करण्यासाठी आम्ही ढाब्याचा रस्ता धरला
गाडी आता वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त जोराने पळत होती आमचे मन वार्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने ढाब्यावर पोहोचले होते.आता पुढील लक्ष होते सिंदखेड राजा जिजाऊंच्या माहेरचा वाडा व जिजाऊ सृष्टी.
गाडी आता वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त जोराने पळत होती आमचे मन वार्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने ढाब्यावर पोहोचले होते.आता पुढील लक्ष होते सिंदखेड राजा जिजाऊंच्या माहेरचा वाडा व जिजाऊ सृष्टी.
#कसे जाल#
औरंगाबाद ते लोणार अंतर 150 किलोमीटर आहे मलकापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत जालना ते लोणार हे फक्त 90 किलोमीटर अंतर आहे रस्ते व रेल्वे मार्ग दोन्हींनी आपणास लोणार या ठिकाणी जाता येते. location Map
श्री.अशोक राहिंज
Bachelor of journalism
विद्या विकास मंदिर राजुरी.
तालुका जुन्नर.जिल्हा पुणे.
Ashok very good
ReplyDelete👌👌👌👌
धन्यवाद
ReplyDeleteलोणार सरोवर ची छान माहिती मिळाली सर 👌👌👌
ReplyDeleteअशोक खरोखरच वेडा झाला आहे.खरोखरच अप्रतिम वर्णन केले आहे. सर्व लेख संग्रह करून छान पुस्तक प्रकाशित करता येईल.पुढील कार्यास आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.पुस्तकाची वाट पाहात आहोत.
ReplyDeleteधन्यवाद
Delete