जुन्नर तालुका म्हटले की डोळ्यासमोर येतात हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि शिवनेरी या पलिकडे जुन्नरची ऐतिहासिक ओळख म्हणजे भारतातील सर्वात जास्त लेण्यांचा समूह जुन्नर तालुक्याला लाभला आहे. माझे मित्र श्री.दत्तात्रय पोखरकर सर मी काहींना कामानिमित्त जुन्नरला गेलो होतो पण काम न झाल्यामुळे आमचा मोर्चा वळला तो तुळजा लेणीकडे.
प्रवासात अंगावर अंतर शिंपावे तसा अधून मधून पाऊस उत्साह वाढवत होता.आजूबाजूचे वातावरण पावसाळ्यामध्ये आणखीनच खुलून येते. मोटर सायकलवर जुन्नरहून मोजून दहा पंधरा मिनिटात लेण्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. लेणीकडे जात असताना लांबूनच या लेण्या आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांपर्यंत जायला रस्ता सोपा असला तरी या ठिकाणी फारशी गर्दी आढळत नाही कारण ही लेणी लोकांना अजूनही फारशी माहिती नाही. लेणी चा नजारा बघितल्यानंतर ही लेणी आपल्या नजरेतून सुटली कशी याचे नवल वाटल्याशिवाय राहिले नाही.
असं म्हणतात की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी म्हणजे तुळजा लेणी, बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी जे आहे ते पाहून समाधान नक्कीच होते. भारतीय पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांमुळे साफसफाई व्यवस्थित आहे. येथील स्तूप बऱ्यापैकी खराब झाला आहे. मात्र अष्टकोनी बारा खांब आपले लक्ष वेधून घेतात. वरती गोलाकार घुमट अजूनही सुव्यवस्थित आहे. बौद्ध भिक्षू साठी कोरलेले विहार बऱ्यापैकी सुव्यवस्थित आहे. मात्र लेण्याच्या दर्शनी भागाची बर्यापैकी पडझड झाली आहे. एक-दोन ठिकाणी अजूनही नक्षीकाम सुव्यवस्थित दिसते. पूर्वी गुराखी किंवा किंवा मेंढ्या चारणारे मेंढके लोक जनावरे चारत असताना रानामध्ये गल (छोटा खड्डा) करून त्यामध्ये गोल गोटे खेळायचे.
तशाच पद्धतीने काही गली (छोटे खड्डे) विहारामध्ये आपणास दिसतात. ही लेणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये कोरलेली असावी असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे .एका भिंतीवर काही वाक्य लिहिलेले आहे पण ते आपणास समजत नाही. एका लेणीमध्ये तुळजाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे बहुतेक या लेणीला तुळजा लेणी म्हणत असावे.
जुन्नर पासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर तुळजा लेणी असून स्वतःच्या गाडीने तिथे जावे लागते. पावसाळा व हिवाळा जाण्यासाठी उत्तम कालावधी. चढण अतिशय सोपी आहे.
तुळजा लेणीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा
श्री.अशोक राहिंज.
विद्या विकास मंदिर राजुरी. तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
अंबिका व भुतलिंग लेण्यासाठी खालील लिंक माझ्या मी सह्याद्री वेडा फेसबुक पेजच्या लिंक वर जा.
मी सह्याद्री वेडा
तुमच्या या पोस्ट च्या माध्यमाने आता भरपूर जुन्नर प्रेमी भेट देतील या लेणीला सर असच नवीन काही पाठवत जा आणि जुन्नर पर्यटनाला प्रोत्साहन देऊया
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete