Thursday, September 9, 2021

वासुदेव

               वासुदेव                                         सकाळी चहाचा पहिला घोट घेत असताना गाण्याचा मधुर स्वर कानी पडला. चहा तसाच ठेवून अंगणात गेलो तर वासुदेव आपल्या सुरेल आवाजात पांडुरंगाचे भजन गात होता. डोक्यावर मोरपिसांची टोपी, त्यावर रुद्राक्षाच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,सफेद पायघोळ अंगरखा, त्याच्या कडेला सुंदर नक्षीकाम, अंगरख्यावर दंडाच्या ठिकाणी केलेले नक्षीकाम, पायांत पिवळे धोतर, गळ्यात रंगीबिरंगी पितांबरे, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ.   काखेला छोटी झोळी,गळ्यात कवड्यांच्या, रुद्राक्षाच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर, गालावर व कंठावर गंधाचे गोल टिळे.खुरटलेली दाढी धारदार नाक व डोळ्यात चमक
 महाराष्ट्रातील अनेक राजांनी लोककलेला व लोकं कलाकारांना राजाश्रय दिला आहे.  बहुरूपी, दरवेशी आणि वासुदेव पहिल्यापासून माझ्या आकर्षणाचा केंद्र राहिली आहे. दरवेशी, गारुडी यांवर सरकारनेच निर्बंध घातले आहे. बहुरूपी, वासुदेव. काळाच्या ओघात लोप पावत असले तरी अधून मधून भेटतात. पूर्वी दारी लोक कलाकार आला की त्याचे कौतुक व्हायचे. जेवणासाठी आग्रह करायचे. छोटी मुले त्याच्या भोवती गोळा व्हायची. आपली इवले इवले डोळे विस्फारून बघायची. काळाच्या ओघात लोक कलाकारांना दक्षिणा पुरेशी मिळत नाही त्यामुळे हे लोक इतर व्यवसायाकडे वळले.    
महाराष्ट्रामधील वासुदेवाची परंपरा हजार- बाराशे वर्षांपूर्वीपासूनची आहे वेग- वेगळ्या संतांच्या साहित्यात वासुदेवाची रुपके आढळतात. वासुदेव  प्रसिद्ध झाला तो एकनाथ महाराजांच्या भजनातून, अभंगातून. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातही मावळ्यांना निरोप देण्यासाठी वासुदेवाचा उपयोग केला जात असे. वासुदेवाला थोडासा बोलते करण्याचा प्रयत्न केला. जीवनात चांगले काम करत राहा त्याचे फळ तुम्हाला मिळते.आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख देणारा तो ईश्वर आहे.त्याचे नेहमी भजन करत रहा असे तो सांगत असतो. आताची पिढी फारशी शिकली नाही. ते या कलेकडे आकर्षित होत नाही. महाराष्ट्राच्या या कला जिवंत रहायला हव्यात. वासुदेवाला दक्षिणा दिली व वासुदेव नवीन गाणे म्हणत पुढे चालला. ते गीत होते                   

वासुदेव मी ऐका ।
चित्त ठायीं ठेवून ऐका ।
डोळे झांकून रात्र करूं नका ।
काळ करीत बैसला असे लेखा गा ॥
राम राम स्मरा आधीं ॥ ॥
वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली  वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||🙏🏻🙏🏻🌹🌈✍🏻✍🏻✍🏻✍🏻 अशोक राहिंज सर. विद्या विकास मंदिर राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे📱📱 75 88 625 406.🙏🏻🌹23.3.2021

3 comments:

  1. लोक कला दुर्मिळ होत चालल्या आहेत .लोकांची आता तितकी अशी भावना या कलावंता वर राहिली नाही.
    मनोरंजनाला विविध साधने निर्माण झाल्यामुळे आता लोकं या कलावंतांंकडे दुर्लक्ष करतात.
    Nice post.

    ReplyDelete
  2. या लोककला जिवंत ठेवायला हव्या.

    ReplyDelete
  3. लोककला ही जनमाणसातील संस्कार व माणुसकी जिवंत ठेवते तिचे महत्त्व व गरज मोबाईल व इंटरनेट च्या जमान्यातील पिढीला मिळणे आवश्यक नाहीतर आमची संस्कृती आम्हांला गुगल कडून परत विकत घ्यावी लागेल म्हणून आशा कलेला व कलाकाराला वाचविणे हे अशोक तुझ्या लेखातून साध्य झाले.तरी आपल्या दोन्ही पिढ्याच्या सांध्यावरील लोकांनां ही बाराबलुतेदारी वाचविणे महत्त्वाचे आहे.अशोक हा तुझा यशस्वी प्रयत्न आहे.तुला मनपूर्वक शुभेच्छा💐💐

    ReplyDelete

लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  ...