सलाम या योद्ध्याला
पंचशीरचा वाघ 'अहमद मसूद'
माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला व ज्या मातेच्या पोटी जन्म झाला तिला कधीही विसरू नये.
सावरकरांनी तर मातृभूमी बद्दलचे प्रेम खूप छान शब्दात व्यक्त केले आहे. तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||
हिंदुकुश ही 800 किमी लांबीची पर्वतरांग आहे जी उत्तर पाकिस्तानपासून मध्य अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली आहे. ही रांग हिमालयीन प्रदेशात येते. वास्तविक, हिंदुकुश रांगा पामीर पर्वतांशी जोडल्या जातात आणि हिमालयाच्या उपशाखा मानल्या जातात. हिंदुकुश पर्वतरांगे मधलाच एक भाग म्हणजे पंजशिर हा भाग अजय मानला जातो. अफगाणिस्तान मध्ये अनेक वर्ष तळ ठोकलेल्या रशिया आणि त्यानंतर अमेरिकेची येथे डाळ शिजली नाही.
पंचशीरचे मसूद घराने नेहमीच मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढे आहे .9 सप्टेंबर 2001 रोजी पत्रकाराच्या वेषात आलेल्या अल् कायदाच्या आत्मघाती अतिरेक्याने अहमद शहा मसूद यांच्यावर हल्ला केला व त्यात ते शहीद झाले. त्यांना 'पंजशिरचे शेर' म्हटले जायचे. याच बहाद्दराने अनेक वर्ष रशियालाही झुंजविले होते.
पंजशीर सोडून जवळजवळ सगळे अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानच्या विरोधामध्ये देणारा आवाज देणारा पुन्हा अफगाण लोकांना नवचेतना देणारा वाघ म्हणजे अहमद मसूद. अहमद मसूद यांची ही डरकाळी पंचशीरमध्ये नव्हे तर सर्व अफगाणिस्तानमध्ये गरजली. अहमद मसूद यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अफगाणिस्तानच्या जनतेने जिवाची पर्वा न करता तालिबानचे विरोधात रस्त्यावर उतरली. पंजाशीर हा प्रदेश काबुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे शे- सव्वाशे किलोमीटर, दोन्ही बाजूने पर्वत रांगेत वसलेला पंजशिर तालिबान्यासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
इराणमध्ये माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 मध्ये मसूदने रॉयल मिलिटरी अकॅडमी सँडहर्स्टमध्ये एक वर्षाचा लष्करी कोर्स केला. यानंतर, त्याने 2015 मध्ये किंग्स कॉलेज लंडन येथे वॉर स्टडीजमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. त्यांनी २०१ राज्यशास्त्रामध्ये लंडन विद्यापीठ, लंडन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
अहमद मसूदचे प्रवक्ते आणि जवळचे साथीदार फहीम दश्ती हे पाकिस्तानने केलेल्या हेलिकॉप्टरच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. अभिमन्यूला जसे सर्व कौरवांनी घेतले होते तसे आज सर्व बाजूंनी अहमद मसूदला आणि त्यांच्या साथीदारांना तालिबानने घेरले आहे आणि सर्व जग हा तमाशा पाहत आहे. या अगोदरही अहमद यांच्या वडिलांना म्हणजे अहमद शहा मसूद यांना भारताने लष्करी मदत केली होती.भारताचे आणि अफगाणिस्तानचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहे. महाभारताच्या काळापासून अफगाणिस्तानचे व भारताचे संबंध होते कौरवांची आई गांधारी ही गांधार प्रदेशातील राज्याची राजकन्या.
आज अर्जुनाला गरज आहे ती कृष्णाची.!! हा कृष्ण सुदर्शन कधी घेऊन येतो आणि या तालीबानी शिशुपालचा वध करतो हे सर्व जग पहाते आहे.
आपल्या झेंड्यासाठी, आपल्या मातीसाठी अहमद मसूद योद्धा लढतो आहे. परदेशात गेलेले हजारो सैनिक माघारी येऊन त्याच्या बरोबर युद्धासाठी उभे आहे. शेवटी मातृभूमीची ओढ सर्वांनाच असते म्हणून तर सावरकर परदेशात गेल्यानंतर मातृभूमीची आठवण झाल्यानंतर ब्रायटनच्त्रा किनाऱ्यावर म्हणतात.
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
या योध्यासाठी नक्कीच एक लाईक करा.
अशोक राहिंज
विद्या विकास मंदिर. राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे.

👍👍Nice Info
ReplyDeleteVery nice blog by Rahinj sir which is fulfilled with information.
ReplyDeleteAs Always awasme Sir😍
ReplyDelete